- अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
- बैलहोंगल तालुक्यातील घटना
बैलहोंगल / वार्ताहर
बैलहोंगल तालुक्यातील हाळे जलीकोप्प गावातील मलप्रभा नदीजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. रामनिंग फकिराप्पा शिंगाडी (वय ४०, रा. तुरमुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, कर्नाटक परिवहनच्या बेळगाव विभागाची बस सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावरून बैलहोंगलकडे जात असताना दुचाकीस्वार बैलहोंगलहून तुरमुरी गावाकडे येत होता. यावेळी मलप्रभा नदीजवळ हा अपघात झाला. धडक बसताच दुचाकी बससमोर अडकली.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी रवींद्र नायकोडी, सीपीआय पंचाक्षरी सलीमठ, पीएसआयएफ मल्लुर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन गणिगेर आणि स्थानिकांनी मृतदेह रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात झाली आहे.
0 Comments