सुळगा (उ.) / वार्ताहर 

सुळगा (उ.) (ता. बेळगाव) येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर नव्याने उभारले जात आहे. दि. १९ जानेवारी रोजी २०२३ रोजी मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला होता. त्यानंतर अविरतपणे नूतन मंदिराचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य मिरवणुकीने मंदिराची चौकट आणण्यात येणार आहे. सकाळी ९ वा. रोहित पेट्रोल पंप सुळगा (उ.) येथून देवस्की पंच कमिटी अध्यक्ष श्री. भावकू भैरू पाटील व सर्व सदस्य यांच्या शुभहस्ते चौकट पूजन करून मिरवणुकीला सुरुवात होणार असून पुढे संपूर्ण गावात चौकट मिरवणूक फिरवली जाणार आहे. 

तरी गावातील समस्त ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती, श्री देवस्की पंच कमिटी, सुळगा, ग्रामपंचायत कमिटी सुळगा, श्री महालक्ष्मी मंदिर बांधकाम कमिटी, सुळगा, ग्रामविकास मंडळ, सुळगा, श्री महालक्ष्मी मंदिर देणगी कमिटी सुळगा तसेच गावातील सर्व नागरिक युवक मंडळे, भजनी मंडळे, शैक्षणिक संस्था, आर्थिक संस्था, महिला मंडळ, सुळगा (उ.) यांच्यावतीने करण्यात आली आहे.