नवरात्री २०२४ : नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रंगाचे महत्त्व असते आणि लोक सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी परिधान करतात. इतकेच नाही, तर नवरात्रीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. फक्त दरवर्षी नवरात्रीला या रंगांचा क्रम बदलतो.

  • मंगळवार ८ ऑक्टोबर २०२४ : सहावी माळ
  • आजचा रंग : लाल 
  • रंगाचे महत्त्व :

लाल हा रंग आवड, शुभसंकेत आणि रागाचे प्रतीक आहे.वैज्ञानिकदृष्ट्या लाल रंग हा शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. लाल रंग धोका आणि सावधपणा दर्शविण्यासाठी वापरला जातो. लाल रंग हा अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातील सर्व शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो. कपडे किंवा पूजेची फुले यासाठी लाल रंगाची प्रथम निवड केली जाते. याशिवाय लाल रंगात ऊबेची भावनाही असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो.