नवरात्री २०२४ : नवरात्री प्रत्येक दिवशी ठराविक रंगाचे कपडे घातल्यास दुर्गा देवी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते अशी धार्मिक मान्यता आहे. खरंतर देवीची विविध रूपे लक्षात घेऊन वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
नवरात्रौत्सवानिमित्त नवरात्री आणि रंगांचे महत्त्व या आमच्या विशेष सदरातून पहिल्या तीन माळांना अनुक्रमे पिवळा, हिरवा आणि राखाडी या रंगांचे महत्त्व आपण जाणून घेतले आहे.
दि. ६ ऑक्टोबर २०२४ ; चौथी माळ
आजचा रंग : नारंगी (केशरी,भगवा)
रंगाचे महत्व :
नारंगी रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट यांचे प्रतिक मानला जातो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असल्यामुळे नारंगी रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे असे मानले जाते. हा रंगाशी पावित्र्यही जोडलेला आहे.
0 Comments