• अध्यक्षपदी रामा यादव ; उपाध्यक्षपदी राजश्री सुर्वे  

कोवाड / लक्ष्मण यादव  

कोवाड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रामा यादव यांची तर उपाध्यक्षपदी राजश्री सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

या समितीत जोतिबा महागावकर, अभिजीत कुंभार, नजीर गणेशवाडी, सविता कांबळे, वर्षा चोपडे, रूपाली सुतार, दीपक वांद्रे व शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती. मधुमती गुंडू गावस, सचिवपदी मुख्याध्यापक कलाप्पा पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी म्हूणन कु. अदिती संभाजी आडाव, कु. वेदांत सुनील कांबळे, शिक्षणतज्ञ म्हणून कल्मेश कांबळे, यांचा समावेश करण्यात आला आहे.

सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी शाळेत पालक मेळावा व व्यवस्थापन समिती पुनर्गठन सभा आयोजित केली होती. याप्रसंगी शाळा समितीच्या नूतन अध्यक्ष - उपाध्यक्षांची निवड तसेच समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी , शिक्षक व पालक उपस्थित होते.