• नेहरूनगर येथील घटना व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावात एका मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामदेव हॉटेलच्या मागे घडल्याचे उघडकीस आले आहे.

नेहरूनगर येथील रहिवासी इस्माईल मुजावर या ७ वर्षीय मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावमधील नेहरू नगर परिसरातील हॉटेल रामदेवच्या मागील बाजूस हा प्रकार घडला असून याची सर्व दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मुलाच्या जागरूक पणामुळे मुलाने आपली सुटका करून तेथून पळ काढला आणि घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी थेट पोलीस स्थानक गाठत घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सांगितले असता त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. 

यादरम्यान झालेला प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.