• विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन 

रायबाग / वार्ताहर 

कौटुंबिक वादातून महिलेने स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील बोम्मनाळ गावात रायबाग पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली. यल्लव्वा कारिहोळे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे तर सात्विक (वय ५) आणि मुथप्पा (वय १) अशी तिच्या दोन मुलांची नावे आहेत. सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले असले तरी पोलिस तपासानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.