बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराच्या हद्दीतील भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील सिंह शुक्रवारी पिंजऱ्यातून निसटला आणि शनिवारी पुन्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला शोधून पुन्हा पिंजऱ्यात जेरबंद केले.
दोन सिंहांना प्राणिसंग्रहालयात आणून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. प्राणी संग्रहालयातील सिंह आणि इतर प्राणी - पक्ष्यांना पाहण्यासाठी या प्राणी संग्रहालयात दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात. पिंजऱ्यातील दोन सिंहांपैकी एक सिंह निसटून बेपत्ता झाला होता. बेपत्ता सिंहांच्या पार्श्वभूमीवर काकती पोलिस प्राणी संग्रहालयात तपासणीसाठी गेले होते. मात्र त्यांनी पोलिसांना चुकीची माहिती देऊन परत पाठवले होते. आता बेपत्ता झालेले सिंहाला पुन्हा पिंजऱ्यात टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
0 Comments