बेळगाव / प्रतिनिधी
तलवार समाजाला कोणताही संभ्रम न ठेवता जात प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावात तलवार समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तलवार समाजाला दाखले देण्यास न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याचे सांगून काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे काही तालुका दंडाधिकारी कार्यालयात तलवार समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र दिले जात नाही. या धोरणाचा निषेध करणारे निवेदन आज तलवार समाजाच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
न्यायालयाने तलवार समाजाला जात प्रमाणपत्र देण्यास मज्जाव केल्याचे सांगून काहींनी संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे तलवार समाजावर अन्याय होत असून सुविधांपासून वंचित आहे. मात्र न्यायालयाचा स्थगिती आदेश नसतानाही तलवार समाजाला जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन अधिकाऱ्यांनी तलवार समाजावर अन्याय केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने तलवार समाज बांधव सहभागी झाले होते.
0 Comments