बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्ली येथे श्रीगणेशाचे काल रविवारी रात्री अत्यंत उत्साही वातावरणात आगमन झाले.

बेळगावच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री शहरातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे २५० ढोल, ७५ ताशा आणि ५० ध्वजांनी नृत्य मिरवणुकीत जल्लोष केला. शिवशंभू, झुंज, ब्रह्मनाथ, धडस आणि वज्रनाथ डोल पथकांचे संगीत रोमांचकारी ठरले.

या आगमन सोहळ्याला प्रमुख पाहुणे माजी आमदार अनिल बेनके, नगरसेविका वैशाली कडोलकर, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, राजू कडोलकर, विकास कलघटगी, श्री गणेशोत्सव महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रोहित रावल, अनिल पावशे, मंडळ अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनिल जाधव, आनंद आपटेकर, राजू कडोलकर आदी उपस्थित होते.

बेळगावात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यानंतर बेळगावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार यांनी बेळगाववासीयांनी भक्तीभावाने गणेशाची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन केले. सुनिल जाधव यांनीही गणेशोत्सवाची माहिती दिली

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून निघालेल्या बेळगावचा राजाच्या मिरवणुकीची कॉलेजरोड, राणी चन्नम्मा सर्कल, कोर्ट मार्ग चव्हाटगल्ली येथे सांगता झाली.