कागवाड / वार्ताहर
कागवाड तालुक्यातील जुगुळ गावात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणालाविजेचा धक्का बसल्याने गंभीर दुखापत झाली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या जुगुळ गावाच्या दौऱ्यावर असताना विजेचा धक्का लागून २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी छतावर चढलेल्या महेश या तरुणाला विजेचा धक्का बसला आणि त्याच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असलेल्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0 Comments