• खानापूर तालुक्याच्या उमरापाणी गावानजीक घटना

खानापूर / प्रतिनिधी 

वाघाने हल्ला करून दोन म्हशींना ठार केले. उमरापाणी (ता. खानापूर, जि. बेळगाव) गावानजीक नागरगाळी पंचायतीच्या हद्दीत ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतात चरण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींवर वाघाने झडप घेतल्याने या म्हशी जंगलात अर्धवट खाल्लेल्या परिस्थितीत सापडल्या आहेत.  म्हशी चरण्याच्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्याच्या खुणा आढळून आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान उमरापाणी येथे घडलेल्या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.