सदलगा / वार्ताहर 

घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू तर अन्य एकजण जखमी झाला आहे. सदलगा (ता. चिक्कोडी ; जि. बेळगाव) येथे सदलगा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. सूर्यकांत शेळके (वय ५५ रा. मूळचा महाराष्ट्र) असे मृताचे नाव आहे. तर येथीलच एक कामगार ज्ञानदेव हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला चिक्कोडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सदर दुर्घटनेत सिलिंडर स्फोटाच्या तीव्रतेमुळे शेजारच्या घराची भिंत कोसळून दोन मुले जखमी झाली आहेत.