• वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत 

बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील दि ब्रह्मलिंग मल्टीपर्पज को - ऑप. सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वा. संस्थेच्या रामघाट रोड, येथील कार्यालयात कार्यालयात पार पडली. 

प्रारंभी शिवराज हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यानंतर बेनकनहळ्ळी येथील सुभेदार नागेश परशराम जाधव यांच्यासह संचालक मंडळाच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश मोनाप्पा पाटील हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाचे तर संचालक मंडळाने कर्मचारी वर्गाचे स्वागत केले. तसेच कर्मचारी वर्गाने सभेसाठी उपस्थित असलेल्या भागधारकांचे स्वागत केले. 

यावेळी हायस्कुलच्या एसएसएलसी परीक्षेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त तसेच प्राथमिक मराठी शाळेतून इ. सातवीत  प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी - विद्यार्थिनी व  भागधारकांच्या मुलांचा मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र, गुलाबपुष्प ,मानधन व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 





या सभेत सुभेदार नागेश परशराम जाधव यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सोसायटीचे सेक्रेटरी श्री. मारुती लक्ष्मण पाटील यांनी वार्षिक अहवाल, नफा - तोटा पत्रक, ताळेबंद याचे वाचन करताना सोसायटीकडे रू. १२,२१,२७,५००.५७ एवढी ठेव, रू. १३,८३,३५,०६८.०५  खेळते भांडवल असून रू. ८,८६,४००.००  भाग भांडवल असल्याचे नमूद केले. गत आर्थिक वर्षात सोसायटीला रू. ५,०५,७०९.०३ एवढा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले.

यावेळी श्री. मोहन कांबळे, श्री. मदन पाटील, श्री. नागेश जाधव यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेताना सोसायटीचे कामकाज समाधानकारक असून संस्थेचे हितचिंतक व सभासदांनी संस्थेकडे जास्तीत जास्त ठेवी ठेवून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. तसेच संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

सभेचे सूत्रसंचालन संचालक राजू मो. पाटील यांनी केले. तर आभार संचालक प्रभाकर देसूरकर यांनी मानले.