- नागमूर्तींसह ,फराळ विक्रीसाठी उपलब्ध
- नागरिकांची खरेदीसाठी गर्दी
बेळगाव / प्रतिनिधी
नागपंचमी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने नागपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. नागपंचमी, श्रावणमास या पार्श्वभूमीवर बाजारपेठही बहरली असून सोमवारपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे.
पावसाने काहीशी उघडीप दिल्याने बुधवारी नागपंचमीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे बाजारपेठ गजबजली होती.
विशेषतः फराळाचे स्टॉल सजले असून चिवड्याचे पोहे, रवा, शेंगदाणे, गूळ, खोबरे, फुटाणे लाह्या आदींची खरेदी जोमाने सुरू आहे.
नागपंचमीला नागमूर्ती पूजण्याची प्रथा आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेल्या रंगीबेरंगी नागाच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. २० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत दराने नागमूर्तींची विक्री होत आहे. खडेबाजार, मारुती गल्ली येथे नागाच्या मूर्ती खरेदी करण्यात लोक गुंतले आहेत.
नागपंचमी सणासाठी पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची ही मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने फुलांचे दरही वाढले आहेत. गुलाब १०० - १२० रुपये किलो, जुई ६० - ७० रुपये असे दर आहेत . साधारणपणे फुलांची १०० ते १५० किलो दराने विक्री होत आहे.
एकंदरीत श्रावणातील पहिलाच सण नागपंचमी असल्याने विशेषतः महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
0 Comments