• बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे रक्षाबंधन 

बेळगाव / प्रतिनिधी 

देशाच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर असलेल्या बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील जवानांना शहरातील भगिनींनी राखी बांधून भाऊ - बहिणीच्या नात्याचे बंध अधिक दृढ केले. 

बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे शालेय विद्यार्थिनी आणि स्वयंसेवी संस्थांच्या महिला सदस्यांसह दोनशेहून अधिक भगिनींनी आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे जवान,अग्निवीर वानांच्या कपाळी कुंकूम तिलक लावत  औक्षण करून राखी बांधली आणि  आपुलकी - माणुसकी तसेच नात्याचे दर्शन घडविले.  तर जवानांनी भगिनींना रक्षणाचे वचन दिले. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी उपस्थितांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना, आज या भगिनींनी कुटुंबापासून दूर असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांना राखी बांधली असून त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या सर्व चिंता आमच्या पाठीशी असाव्यात आणि तुमचे सर्व सुख तुमच्या पाठीशी असावे, असा आनंद व्यक्त केला.