बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाली असून, नुकसान झालेल्या घरांची ठिकाणे ओळखून त्याची माहिती गृहनिर्माण महामंडळाच्या पोर्टलवर टाकून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, शेती व बागायती पिकांच्या नुकसानीचे संबंधित विभागांसोबत संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे व नुकसानीची आकडेवारी रिलीफ पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात यावी, असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवारी (१३ ऑगस्ट) झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जिल्ह्यातील एकूण नुकसान झालेल्या घरांची माहिती उपलब्ध आहे. नुकसान झालेल्या घरांना भरपाईचे वाटप लवकर कराये नुकसान भरपाई वितरीत करण्यास विलंब होता कामा नये ते म्हणाले की, अधिकान्यांनी बाधित भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घराच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानीच्या वर्गवारी नमूद केल्या पाहिजेत.
बेळगाव तालुक्यातील 4 नुकसानग्रस्त घरांची भरपाई यापूर्वीच जाहीर झाली आहे. उर्वरित नुकसानझालेल्या घरांची माहिती नोंदवावी आणि शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
हुक्केरी तालुक्यातील घरांच्या नुकसानीची पात्र प्रकरणे गृहनिर्माण महामंडळाच्या पोर्टलवर नोंदविण्यात यावी आणि नुकसान भरपाईचे वितरण त्वरित करण्यात यावे. त्यांनी हुक्केरी तहसीलदारांना व्हिडिओ संभाषणाद्वारे निर्देश दिले की, नुकसान झालेल्या घरांची वर्गवारी करण्यात यावी आणि अ, ब यासह सर्व श्रेणीची गृहनिर्माण महामंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. अतिवृष्टी पुरामुळे पावसाचे नुकसान, पिकांचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यावर उपाययोजना करण्यास विलंब होता कामा नये. या सदर्भात पुरेसे सर्वेक्षण झाले पाहिजे राजीव गांधी गृहनिर्माण महामंडळाच्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचण असल्यास अशा घरांबाबतही अहवाल द्यावा. हुक्केरी, अथणी. चिक्कोडी या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. संबंधित अधिकान्यांनी बाधित क्षेत्राला भेट देऊन पिकांच्या नुकसानीचा अहवाल सादर करावा.
संबंधित तहसीलदारांनी कृषी व फलोत्पादन विभागाच्या समन्ययाने सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी पथके तयार करून सर्वेक्षणाचे काम आठवडाभरात पूर्ण करावे, अशी सूचना केली. जिल्ह्यात पावसामुळे विविध भागात एकूण 100 किमी नुकसान झाल्याची माहिती आहे. सर्वेक्षण करून खराब झालेल्या रस्त्यांची संपूर्ण माहिती देण्यात यावी. रस्ते बांधणी व देखभाल दुरुस्तीसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. घराच्या नुकसानीवरील सर्व अधिकारी पारदर्शक अहवाल द्यावा, या मागील रांगेतील घरांचे नुकसान झाले असल्यास त्यांचीही माहिती द्यावी व नुकसानीचा उल्लेख संबंधित रांगेत करावा. सर्व तालुका अधिकायांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी करावी. नुकसान झालेल्या अंगणवाडी व शाळांच्या इमारतींची दुरुस्तीची कामे करण्यासाठी संबंधित अधिकायांनी पाहणी करावी, असे निर्देश जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. पावसाच्या नुकसानीच्या उपाययोजनामध्ये सर्व विभागांमध्ये समन्वय असावा माहिती अर्जात विलंब न लावता त्वरित उपाय प्रदान केला पाहिजे. जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्यांबाबत जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगर पालिकेचे आयुक्त अशोक ढुङगुटी, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक आर बी बसरगी बेळगाव उपविभागीय अधिकारी श्रावण नायक, बेळगाव तहसीलदार बसवराज नागराळ, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगोडा पाटील, जिल्हा नागरी विकास कक्ष नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी, जिल्हा पंचायत मुख्य नियोजन संचालक गंगाधर दिवितार, नियोजन संचालक रवी बंगारप्पन, उपविभागीय संचालक महापुरुष पाटील, उपविभागीय संचालक डॉ. मुरगोड, अनुसूचित वर्ग कल्याण अधिकारी बसवराज कुरीती यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी बेठकीला उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सर्व तहसीलदार, तालुका पंचायत अधिकारी सहभागी झाले होते.
0 Comments