बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार (वय ८४) यांचे आज बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी ६ वा. निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. 

त्यांचा बालवयापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात सक्रिय सहभाग होता. बेळगाव सीमा पटनासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी कारावास देखील भोगला होता. त्यांच्या निधनाने एक भारदस्त आवाज हरपला आहे.