बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तथा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे क्रीडा विभागाच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिले मल्टी स्टेडियम उभारण्यात येणार आहे. शनिवारी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बेळगुंदी येथील गावाच्या बाहेर भागात वारल्या जाणाऱ्या हायटेक स्टेडियमच्या जागेची पाहणी केली.

यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, स्टेडियमची जागा लवकर निश्चित करून कामाला सुरुवात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या स्टेडियममध्ये हायमास्ट बसवण्यात येणार असून सदर स्टेडियमचा दिवस-रात्र वापर करता येणार आहे. तसेच क्रिकेट, कुस्ती, स्विमिंगपूल, कबड्डी, व्हॉलीबॉल आदी खेळांची येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. 

यावेळी क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास, शिवाजी बोकडे, प्रल्हाद चिरमुरकर, दयानंद गावडा, रहमान तहसीलदार, महादेव पाटील, शाम गावडा, अजित नाईक, कृष्णा गावडा, रवी नाईक, मेहबूब मुजावर, स्वीय सहाय्यक सातेरी कोकितकर आदी उपस्थित होते.