- कुप्पटगिरी येथील घटना
खानापूर / प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना, वारकरी महिलेचाच हृदयविकाराने मृत्यू झाला. कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथे बुधवार दि. १७ रोजी ही घटना घडली. यल्लू उर्फ बायजा यशवंत पाटील (वय ७२) असे या वारकरी महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गावातील वारकरी मंडळींच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दुपारी १ वाजता दिंडी सुरू करण्यात आली होती. या दिंडीमध्ये सदर महिला सहभागी होऊन टाळ वाजवत होती. यावेळी सायंकाळी ४ वा. हृदयविकाराचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला.
एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये सामील होऊन आपली सेवा करत असताना, तिने आपला प्राण सोडला. यामुळे परिसरातील वारकरी संप्रदाय गहिवरला. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सकाळी होणार आहे. खानापूर येथील तहसीलदार कार्यालयातील लिपिक हणमंत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments