- पूरपरिस्थिती संदर्भात पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या संदर्भात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते व निवडणुक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पूरपरिस्थिता संपूर्ण आढावा घेतला. यानंतर फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना, सुविधा व बचाव कार्याचे नियोजन करुन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पूरामुळे ज्या नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, दुकानदारांचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेशही फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर संपर्क तुटलेल्या गावांमध्ये मदतकार्य व वैद्यकीय सुविधा पोहचवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे अशी माहिती शिवाजीराव पाटील यांनी पत्रकारांना दिली.
0 Comments