निपाणी / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे चिक्कोडी - निप्पाणी तालुक्याच्या सखल भागातील चार पूल पाण्याखाली गेले असून, गावांचा संपर्क तुटला आहे.
महाराष्ट्राच्या कोकण भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुराची चिंता सतावत आहे. त्याशिवाय चिक्कोडी तालुक्यातील अकोळ - सिद्द्नाळ, जत्राट - भिवशी, करदगा -भोज आणि मांजरी-बावनसौंदत्ती पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे संबंधित गावांचा संपर्क तुटला आहे. पुरापासून सावधगिरीचा उपाय म्हणून नदीकाठावर नोडल अधिकारी आणि बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.
0 Comments