बेंगळुरू : राज्याच्या विशेष निवासी शाळांमधील सेवारत कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणांसह मूलभूत मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकरच विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष गरजा असलेल्या मुलांसाठीच्या निवासी शाळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. 

गेल्या १४ वर्षांपासून विशेष शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेमी पगारवाढीबाबत संबंधित विभागाशी चर्चा केली जाणार आहे. याशिवाय दरमहा पगार देण्याची यंत्रणा राबविण्यात  येईल, असे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. या बैठकीला बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.