बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील हॉकी बेळगाव संघटनेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप या क्रीडा महोत्सवातील हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी मान्यताप्राप्त स्कूल गेम्स अँड ऍक्टिव्हिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित १८ वी ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मुलींची हॉकी स्पर्धा पेडम, म्हापसा - गोवा येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत हॉकी बेळगाव संघटनेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम सामना जिंकून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. विजेत्या संघाला हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, विनोद पाटील, सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, महादेव सावंत, नामदेव सावंत, सुरेश पोटे, श्रीकांत आजगावकर, विकास कलघटगी, अश्विनी बस्तवाडकर आदींचे प्रोत्साहन लाभले.
0 Comments