बेळगाव / प्रतिनिधी 

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील नुगानट्टी गावामध्ये घडली आहे.सदर घटना मंगळवारी घडली असून या खूनाचा उलगडा बुधवारी सकाळी झाला. मृत युवकाचे नाव बसवराज गुरुलिंगप्पा मुद्दण्णवर (वय २३) असे आहे. 

वैयक्तिक भांडणांमधून हे कारस्थान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी चौघा जणांनी मिळून बसवराज याला आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी निमंत्रित केले त्यानंतर त्याच्याशी भांडण करून त्याला मारहाण केली आणि भोसकले. ज्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला. त्यानंतर ते चौघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी मुरगोड पोलीस अधिक तपास करत आहेत.