बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा वावर वाढला असून, याला आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत.
कित्तूर येथील बोगस डॉ. लाडखान प्रकरणानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाला असून, ज्याठिकाणी नागरिकांनी तक्रार केली तेथे संबंधित रुग्णालय किंवा दवाखान्यांवर कारवाई करून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्याच्या अनेक भागात असे छापे सुरूच आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर मंगळवारी बेळगाव शहराच्या भडकल गल्लीतील शिवा क्लिनिकवर छापा घालून टाळे ठोकण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
दरम्यान शिवा क्लिनिकला नोटीस दिल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बेळगावचे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ आणि बेळगावच्या तहसीलदार यांनी छापेमारी करून ही कारवाई केली.
यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी म्हणाले, ते भडकल येथील शिवा क्लिनिक अशी नेमप्लेट लावून आत औषधी वितरीत करत आहेत. त्यांच्याकडून मिळालेली नोंदणी बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. डॉक्टर कुठे आहेत, असे विचारले असता, येथील कर्मचारी ते शेतात काम करत असल्याचे सांगतात.
शिवाक्लिनिकबद्दल लोकांनी जागरुक राहावे. या क्लिनिकबाबत तीन वर्षांपूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हा घेराव घालण्यात आला. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दुसऱ्यांदा आल्यानंतर आम्ही पुन्हा रुग्णालय सील करत आहे, असे ते म्हणाले.
- चिक्कोडीतील बोगस डॉक्टर रियाज मुल्लाला शिक्षा :
0 Comments