खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर येथील मारुतीनगर येथे चार दिवसापासून बंद असलेल्या घराचा दरवाजा कुलूप तोडून चोरट्यांनी १० तोळे सोने आणि २० तोळेे चांदी व पाच हजाराची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, जुन्या पुलाजवळ असलेल्या मारुतीनगर खानापूर येथे बसवंत वैजू निलजकर मुळगाव यडोगा यांनी एक वर्षांपूर्वी बांधलेल्या नवीन घराचा मजबूत दरवाजा तोडून चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे. बसवंत हे सैन्यात असतात आणि पत्नी निता मुलांना सुट्टी असल्याने गावाला गेलेल्या पाहून चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी दरवाजाला लहान छिद्र  करून आतून कुलूप तोडले आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.