कागवाड / वार्ताहर    

शेतात काम करत असताना विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. शेडबाळ (ता. कागवाड) येथे ही दुर्दैवी घटना घडली. अभिषेक विजयकुमार बारगळे (वय ३२ रा.शेडबाळ) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात  पत्नी, दोन मुली व भाऊ असा परिवार आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अभिषेक बागेतील शेतीच्या कामात व्यस्त असताना जमिनीवरील तुटलेल्या तारेचा त्यांच्या पायाला स्पर्श झाला. यावेळी स्थानिकांनी तरूणाच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अभिषेकला अधिक उपचारासाठी नजीकच्या महाराष्ट्र राज्यातील मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच अभिषेकने अखेरचा अखेरचा श्वास घेतला. 

आज सायंकाळी शेडबाळ येथील स्मशानभूमीत अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील ग्रामस्थ व नातेवाईक सहभागी झाले होते.