बेळगाव / प्रतिनिधी
नीट परीक्षेच्या निकालातील बेकायदेशीरपणाची चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन भारतीय युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. नीट परीक्षेच्या निकालातील बेकायदेशीरपणाची चौकशी करण्याची विनंती भारतीय युवक काँग्रेसचे डॉ. शेख सोहेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
चालू वर्षातील नीट परीक्षेच्या निकालात अनियमितता झाली आहे. यामध्ये एकाच केंद्रातून ६७ विद्यार्थ्यांनी ७१८,७१९ गुण मिळवले असून, यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे याला थेट परीक्षा व्यवस्थापन मंडळच कारणीभूत असल्याची तक्रार त्यांनी केली.
नीट परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणार होता. मात्र निकाल १० दिवसांपूर्वीच प्रकाशित झाल्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. मोदींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
0 Comments