बेळगाव :  दिवंगत राधाबाई रामकृष्ण जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विजया हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, बेळगाव यांच्यातर्फे होन्निहाळ गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी  शिबिराचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती.

प्रारंभी डॉ. रवी पाटील यांच्यासह पंचमंडळींनी दीपप्रज्वलन करून या शिबीराला चालना दिली.यावेळी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, दिवंगत राधाबाई रामकृष्ण जाधव यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. 

तर डॉ. रवी पाटील म्हणाले, गावातील लोक आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. यामुळे ते आजारी पडतात. वेळेवर आरोग्य तपासणी करून निरोगी राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी शहाजी जाधव, जोतिबा जाधव, चंद्रकांत केंगेरी, चनय्या मठद, इरय्या मठद, भरमा कटबुगोल, दानय्या गिरमनावर, चंद्रकांत जाधव, रायप्पा केंगेरी, बसवंत केंगेरी, महांतेश आजापन्नवर, सिद्दय्या मठपती आदी उपस्थित होते.