विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील शिरशाड गावात माहितीच्या आधारे अन्न निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला. हनमंतराय गौडा पाटील यास अटक करण्यात आली आहे.
शिरशाड गावातील एका शेतातील शेडमध्ये अन्नभाग्य तांदूळ अर्थात रेशनचा तांदूळ त्यांनी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवला होता. पोलिसांनी छापा टाकून १,८९,२९० लाख रू. किंमतीचा ८२३० किलो तांदूळ जप्त केला. तसेच पोलिसांनी वाहनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इंडी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न निरीक्षक परमानंद हुगार, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद, एएसपीआय अरवट्टी, एस. एच. नरोटी, जेरटगी, आर.गाडेद यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments