चिक्कोडी / वार्ताहर
उद्या दि. ७ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत ८ विधानसभा मतदारसंघात मस्टरिंग केंद्रे उघडण्यात आली आहेत.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी सोमवार (दि. ६) मे रोजी एसकेपीयू कॉलेज, हुक्केरी, एसएसएमएस, अथणी, शिवानंद पीयू कॉलेज, कागवाड आणि महावीर स्कूल, रायबाग येथील मस्टरिंग केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले की, मतदान केंद्र कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदान केंद्रात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी अत्यंत सावधगिरीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह हुक्केरी, अथणी, रायबाग, कागवाड विधानसभा मतदार संघाचे तहसीलदार उपस्थित होते.
0 Comments