बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार आणि गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता संजय पाटील यांच्या मातोश्री कुसुम पाटील (वय ९०) यांचे आज रविवार दि. २६ मे रोजी सकाळी १० वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना जावई नातवंडे असा परिवार आहे.

आज रविवारी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर येथील हालोंडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.