- खासगी रुग्णायलयात उपचारा दरम्यान मृत्यू
- सुळगा (हिं.) येथे सहा दिवसांपूर्वी घडली होती घटना
- घटनेने सुळगा (हिं.) गावात हळहळ
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे शनिवार दि. १८ मे रोजी सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. २४ मे रोजी सायंकाळी खाजगी इस्पितळात दाम्पत्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
शंकर गल्ली, सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय ६१) हे दोघेही शनिवार दिनांक १८ मे रोजी घरामध्ये सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी खाजगी इस्पितळात हलवले होते. मात्र उपचार सुरू असताना सहा दिवसानंतर मृत्यू ओढवला आहे.
सदर दाम्पत्य दुमजली घरात झोपले होते. पहाटे स्वयंपाक घरात येऊन विद्युत लाईट सुरु करताच आगीचा भडका उडाला होता. रेग्युलेटर मधून गॅस गळतीमुळे हा अपघात घडल्याचे समजते.
सहा दिवसानंतर मृत्यूशी झुंज देत अखेर दाम्पत्याचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दाम्पत्यावर शनिवार दि. २५ मे रोजी सकाळी ११.३० वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून मुलगी, जावई असा परिवार आहे.
0 Comments