बेळगाव / प्रतिनिधी 

मे महिन्यात गोवा आणि सांगली येथे झालेल्या खुल्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव स्केटर्सनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ६ सुवर्ण, ३ रौप्य अशी एकूण ९ पदके जिंकली. या चॅम्पियनशिपमध्ये ४०० हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला होता. यामध्ये जान्हवी तेंडुलकर हिने ४ सुवर्ण, अर्शन माडीवाले याने १ सुवर्ण आणि ३ रौप्य, सौरभ साळोके याने १ सुवर्णपदक पटकाविले. 

सदर सर्व स्केटर्स स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर,विठ्ठल गगणे,अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, विश्वनाथ येलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व  शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत . 

या सर्व स्केटर्सना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस के. आर.एस.ए, यांचे प्रोत्साहन लाभत आहे.