बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वत्र भाजपला अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याचे भाजपचे बेळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.आज रविवार (दि. ५) मे रोजी बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, माझा उमेदवारी अर्ज सादर करताना मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगावातील सभा देखील यशस्वी झाली. बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती येथे चारही बाजूंना मी प्रचार केला आहे . तेव्हा देशाच्या रक्षणासाठी जनता भाजपला मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी मुख्यमंत्री असताना, बेळगावची स्मार्ट सिटी म्हणून निवड करण्यासाठी १०० कोटींचे अनुदान दिले होते. तेव्हा निवडून आल्यानंतर बेळगावचा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बेळगाव आणि गोकाकमध्ये काँग्रेसला अजूनही पराभवाचा धोका आहे. काँग्रेसचे नेते आणि स्थानिक कार्यकर्ते पैसे देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गोकाक येथे अशी एक घटनाही उघडकीस आली आहे. ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याची टीका त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, महानगर भाजपअध्यक्षा गीता सुतार, ॲड. एम.बी.जिरली यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments