• बेळगाव जिल्ह्याच्या मुदलगी तालुक्यातील घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून पतीने स्वतःदेखील आत्महत्या केली. पुलगड्डी (ता. मुदलगी; जि. बेळगाव) गावात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. येल्लाव्वा नंदी असे हत्या झालेल्या पत्नीचे तर अण्णाप्पा नंदी याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, घरातील म्हैस विकून आलेल्या पैशातून पती अण्णाप्पा खूप  दारू प्याला. यानंतर  दारूच्या नशेतचं तो घरी आला. पती दारू पिऊन आल्याचे पाहताच पत्नी येल्लाव्वा हिने त्याला जाब विचारला. पती अण्णाप्पा याला आधीचं पत्नीवर संशय होता, त्यातूनच नशेत  रागाच्याभरात त्याने पत्नीची हत्या केली. तसेच स्वतःदेखील घराबाहेर असलेल्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद मुडलगी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.