- अथणी तालुक्याच्या अनंतपूर गावातील घटना
अथणी / वार्ताहर
विहिरीवर पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अनंतपूर (ता.अथणी ; जि. बेळगाव) येथे ही दुर्दैवी घटना घडली. शिवानंद मधू मैत्री (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत शिवानंद हा एक दिवस घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, तो अनंतपूर गावातीलमैत्री यांच्या शेतविहिरीत पोहायला गेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच अग्निशामक दलाला पाचारण केले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढला, शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाची नोंद अथणी पोलीस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments