• बीम्सचे संचालक अशोक कुमार शेट्टी यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

तांत्रिक कारणामुळे रखडलेले बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे बीम्सचे (BIMS)  संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी सांगितले. तसेच बेळगाव शहरात १४० कोटी खर्चाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्णत्वास येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

तांत्रिक कारणामुळे बेळगावच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन होऊ शकले नाही. बेळगावच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यास ते जनतेला समर्पित केले जाणार आहे. बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे छोट्यात छोटे कामही पूर्ण झाले असून ते आमच्याकडे सोपवायचे बाकी आहे. अग्निशमन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर ते पूर्ण केले जाईल, असे ते म्हणाले. 

तरीही प्रसूती विभागात बरेच बदल करण्यात आले आहेत. बाळ आणि बाळंतिणीसाठी गरम पाण्याची व्यवस्था आणि रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे बरेच लक्ष दिले जात आहे. बीम्सच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे लागेल, असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.

पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि इंडो-क्रोनोलॉजी विभाग आहेत. गॅस्टोलॉजी, नेफॉलॉजी, सर्जिकल गॅसोलॉजी विभाग दुसऱ्या मजल्यावर आहेत. व्हीआयपी कक्ष आणि जनरल रूम तिसऱ्या मजल्यावर असून ऑपरेशन थिएटर चौथ्या मजल्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली. 

बेळगाव जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी रुग्णालयाने सर्व सुविधांचा अवलंब केला आहे, अशा पद्धतीने आपत्कालीन सेवा लोकांना उपलब्ध होईल, त्याचा फायदा गोवा, महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांनाही होईल, असे ते म्हणाले.