बेळगाव / प्रतिनिधी
पाणी भरण्यासाठी टाकीचे झाकण उघडून ठेवण्यात आले होते. यावेळी घरातील अडीच वर्षाची बालिका त्या टाकीत पडून पाण्यात गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी कंग्राळ गल्ली येथे ही घटना घडली. साहिशा संदीप बडवाण्णाचे (वय २.५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे.
महानगरपालिकेने सोडलेले पाणी भरण्यासाठी साहिशाच्या आईने जमिनीवर असलेल्या टाकीचे झाकण उघडून ठेवले आणि अन्य कामासाठी ती पहिल्या माळ्यावर गेली होती.
यावेळी खाली असलेली साहिशा खेळताना उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पडली आणि पाण्यात गुदमरून बेशुद्ध झाली.
यानंतर तिला तातडीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद खडेबाजार पोलिस स्थानकात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments