अथणी / वार्ताहर
दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अथणी तालुक्यातील गुंडेवाडी पार्थनहळी दरम्यान असणाऱ्या जत-जांबोटी महामार्गावर ही घटना घडली.
मल्लय्या मठपती (रा. बळ्ळीगेरी) असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर आणखी एक दुचाकीस्वार हा महाराष्ट्रातील वज्रवाड या गावचा रहिवासी असून तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अथणी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद अथणी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments