- चाय-पे-चर्चा कार्यक्रमाद्वारे घेतल्या हनुमाननगर - विनायकनगर येथील जनतेच्या गाठीभेटी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर प्रचाराच्या माध्यमातून थेट जनतेच्या गाठीभेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शहर आणि उपनगरातील कामात व्यस्त आणि सहसा न भेटणाऱ्या नागरिकांशी सकाळी मॉर्निंगवॉकच्यावेळी चाय-पे-चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे.
आज गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी केएलई इंटरनॅशनल स्कूल, मधुर कॉलनी, विनायकनगर स्कीम क्र. ५१ मध्ये, शेट्टर यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या नागरिकांशी "चाय-पे-चर्चा" कार्यक्रमाद्वारे संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. तेव्हा ते तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आगामी निवडणुकीत बेळगाव मतदार संघात मला अर्थात भाजपला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
- "सिंधी समाजातील" नेत्यांच्या बैठकीला शेट्टर यांची उपस्थिती :
लोकसभा निवडणुकीचा एक भाग म्हणून बेळगाव येथील विनायकनगर सिंधी कॉलनी येथील सिंधीभवन येथे "सिंधी समाज"च्या नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी सिंधीसमाजातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
सत्कारानंतर बोलताना शेट्टर यांनी निवडून आल्यानंतर सिंधी समाजाच्या उत्कर्षासाठी अविरतपणे काम करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच निवडणुकीत मतदानाच्यामाध्यमातून समाजाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, विधान परिषद सदस्य श्री.हणमंत निराणी, नगरसेविका वीणा विजापुरे, संदीप जिरगिहाळ, संतोष पेडणेकर, मंडळ अध्यक्ष रामा जमुनाने, मुरुगेंद्रगौडा पाटील, डॉ.सोनाली सरनोबत,अनिकेत धर्माधिकारी,नरेश मुलाणी व इतर नेते उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात शहरातील पांगुळगल्ली येथे व्यापाऱ्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या, यावेळी काही व्यापाऱ्यांनी त्यांचे स्वागत व छोटेखानी सन्मान करून शुभेच्छा दिल्या. यानंतर श्रीनगर येथील चन्नम्मा सोसायटी येथे श्री शिवंजनेय सेवा विकास संघाने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून प्रचार करताना पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी बेळगाव मतदार संघात मला अर्थात भाजपला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेविका लक्ष्मी राठोड, विजय कुडीगनूर,असोसिएशनचे अध्यक्ष महादेव राठोड, चंद्रशेखर मुलीमनी, मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
0 Comments