- जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला विश्वास : गोकाक येथे बैठक
शेट्टर यांनी रविवारी गोकाक तालुक्याचा दौरा केला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत त्यांनी तालुक्यांच्या विविध गावात कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेतल्या. प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस हा केवळ इशाऱ्यांवर चालणारा पक्ष आहे. परंतु भाजपा पक्ष ध्येयधोरणे घेऊन चालत असल्यामुळे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला येत असल्याचे त्यांनी सांगितले.
- शहापूर शिवाजी उद्यानात चाय पे चर्चा अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद :
रविवारी सकाळी जगदीश शेट्टर यांनी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
- शनिवारी संपन्न झाली जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे महत्त्वाची बैठक :
शनिवारी रात्री जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत निवडणुकी संदर्भातील रणनिती ठरविण्यात आली.
0 Comments