अथणी / वार्ताहर 

आर्थिक कारणावरून दोन कुटुंबामध्ये झालेल्या भांडणात ३ वर्षीय बालिकेचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना (बुरलाटी ता. अथणी ; जि. बेळगाव) येथे घडली आहे. श्रीनिधी कडप्पा कला पाटील (वय ३) असे मृत बालिकेचे नाव आहे. जोतिबा तुकाराम बाबर असे आरोपीचे नाव आहे. 

दोन्ही कुटुंबात आर्थिक कारणावरून भांडण झाले. यावेळी जोतिबा तुकाराम बाबर याने मारामारी करताना छातीवर वार करून बालिकेची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला . याप्रकरणाची नोंद ऐगळी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.