लक्ष्मण यादव / कोवाड 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचा कोल्हापूर दौरा नुकताच पार पडला. याप्रसंगी जिल्ह्यातील धनुष्यबाण शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या पदांची नियुक्ती करण्यात आली यावेळी चंदगड मधून किणी कार्यात भागात पक्ष वाढीसाठी कोवाडचे युवा उद्योजक श्री. सुधीर पुंडलिक पाटील यांची तालुका उपाध्यक्ष पदी अभिनंदनिय निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक नामदेव जी. निटूरकर, तालुका अध्यक्ष कल्लाप्पान्ना निवगिरे, चंदगड तालुका युवा सेना अध्यक्ष गजूभाई गावडे, शिव उद्योग तालुका अध्यक्ष सुशांत नौकुडकर, शिवसेना सल्लागार संभाजी पाटील, महिला आघाडी प्रमुख सौ.सुजाता कुंभार, छाया कांबळे रंजना सुभेदार, इंद्रायणी बोकमुरकर, अविनाश पाटील तसेच शिवसैनिक उपस्थित होते.