बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील शुक्रवार दि. १९ रोजी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून शुक्रवारी सकाळी १० वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
बेळगाव शहर व तालुकाच्या सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील आणि तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
0 Comments