• श्री लक्ष्मी देवी वाढदिवसानिमित्त समृधा फाउंडेशनतर्फे आयोजन 

कल्लेहोळ / गोपाळ पाटील 

कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील श्री लक्ष्मी देवीचा वाढदिवस शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी होणार असून पहाटे देवस्थान कमिटीकडून मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा होणार आहे. यानंतर ओटी भरणे कार्यक्रम आणि दिवसभर वार पाळणूक केली जाणार आहे.  

या निमित्ताने गावात रात्री ठीक ८.०० वाजता समृधा फाऊंडेशन बेळगांव यांच्यावतीने अंध मुलांचा गायन कार्यक्रम होणार आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.