- मराठी संघटन बेळगाव - जय हनुमान कुस्तीगीर संघटना सावगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
मौजे सावगांव (ता. जि. बेळगाव) येथे कै. परशराम पैलवान आणि कै. खासदार सुरेश अंगडी यांच्या स्मरणार्थ मराठी संघटन बेळगाव आणि जय हनुमान कुस्तीगीर संघटना सावगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४ एप्रिल रोजी ठीक २-०० वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये १. पै. मिलाद इराण जागतिक विजेता विरुद्ध पै. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी (ता. गंगावेस कोल्हापूर), २.पै. समीर शेख विरुद्ध पै. उदयकुमार दिल्ली, ३.पै. उमेश चव्हाण विरुद्ध पै. अरुण बोंगार्डे, (मोतीबाग कोल्हापूर), ४.पै.नागराज बशीडोणी विरुध्द पै. नवीनकुमार दिल्ली या दिग्गज मल्लांमधीलमुख्य चार कुस्त्यांसह अन्य पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत.
सदर कुस्ती मैदानाच्या उद्घाटनाला मा. पै. रुपेश पाटील, (अध्यक्ष कुस्तीगीर संघटना सावगांव), डॉ. रवी पाटील (विजया हॉस्पिटल बेळगांव), संजय पाटील (गोमटेश विद्यापीठ अधिष्ठाता), मोहन मोरे माजी (जि. पं. उपाध्यक्ष), मदनकुमार भैरपन्नावर (रियल इस्टेट एजंट), महांतेश कवठगीमठ, विनय कदम स्वागताध्यक्ष (मराठा संघटन बेळगाव) यांच्यासह अन्य प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहून या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments