बेळगाव / प्रतिनिधी 

नैऋत्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेकजण फिरायला जात असल्यामुळे रेल्वे गाड्यांवर होणारा प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी योजना रावबिण्यात येणार आहे. हुबळी ते ऋषिकेश दरम्यान ही विशेष रेल्वे धावणार असून, ती बेळगाव येथेही थांबणार आहे.

आठवड्यातून एकदा सोमवार ते गुरुवार ही रेल्वे या मार्गावर धावणार आहे. सोमवारी २९ एप्रिलपासून ती सुरू होणार आहे. निवडणूक काळ असल्यामुळे आचारसंहितेचे पालन करीत या विशेष सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महिन्याती सोमवारी (06, 13, 20 आणि 27 मे) आणि गुरुवारी (02, 09, 16, 23 आणि 30 मे) ती नियमित सुरू राहणार आहेत. या गाडसाठी सामान्य भाडे संरचनांमध्ये सवलत दिली जाईल. सोमवारी रात्री ९ .४५ वाजता ही रेल्वे हुबळी जंक्शनहून सुटेल. ती बेळगाव येथे रात्री १२.२५ (मंगळवारी) वाजता येईल. त्यानंतर मिरज, सातारा, पुणे, कोपरगाव, मनमाड आदी स्टेशने घेत ती बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता ऋषिकेश येथे पोचेल. गुरुवारी सायंकाळी ५.५५ वाजता तिचा परतीचा प्रवास सुरू होर्ईल. शनिवारी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान ती बेळगाव येथे येईल व ६.३० वाजता हुबळी येथे पोचणार आहे.