घटनास्थळी उलटलेली अपघातग्रस्त कार  

खानापूर / प्रतिनिधी 

लोंढ्याकडून बेळगावकडे येणारी महिंद्रा एक्सयुव्ही कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कार एका दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वारासह कार मधील एकजण असे दोघे जागीच ठार झाले. तर चार जखमी झाल्याची घटना दुपारी तीनच्या दरम्यान खानापूर गणेबैलदरम्यान आयटीआय कॉलेज जवळ घडली.

सदर अपघात इतका भीषण होता की, लोंढ्याकडून बेळगावकडे जाणारी महिंद्रा एक्सयूव्ही कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि खानापूर शहरातून बायपास रस्त्याने बेळगावकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वारकाला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महिंद्रा एक्सयूव्ही 500 कारचा रस्त्याकडे चार ते पाच पलट्या खाल्याने चेंदामेंदा झाला. या कार मधील एक जण गंभीर अवस्थेत बेळगावला घेऊन जात असताना वाटेतच ठार झाला. अन चौघे जर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे. तर आणखी चार जण कार मधील जखमी झाले आहेत. घटनास्थळी खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस गुन्हे विभागाचे पोलीस गिरीश एम. पोलीस निरीक्षक बिराजदार, पीएसआय चनबसपणावर, हवालदार जयरामसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतांची ओळख पटवली.

या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव रमेश अशोक पाटील भेंडवाड रायबाग असे आहे. सदर रमेश हा सगुना फूड्स कंपनीमध्ये विभागीय मॅनेजर म्हणून काम करत होता. तो खानापूर तालुक्यात पोल्ट्री कंपन्यांना भेट देण्यासाठी आला होता. तर लोंढ्याहून बेळगावकडे जाणाऱ्या केए 22 एमएल 6970 या कार मधील एक जण गंभीर अवस्थेत असताना बेळगावला घेऊन जात असताना तो जागी ठार झाला त्याचे नाव मिळू शकले नाही. सदर मयत कलाईगार गल्ली बेळगाव येथील असल्याचे समजते. घटनास्थळी आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपा अध्यक्ष संजय कुमार, वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी आदींनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन पोलिसांना सहकार्य केले.